A Poem...

'शोध'

तू ओंजळ भरल्या सुवासाचा पारिजातकी स्पर्श...
तू निरागस मनमधील अननुभूत हर्ष....

तू तप्त, त्रस्त जीवासाठी भरल्या मायेचा हात...
कुट्ट काळोखाच्या गर्भातही कधीच न सुटणारी साथ...

तू प्रेमाची पाखर धरणारी त्या आईची कूस...
आणि त्या कुशीत मन मोकळ करणारा माझ्या डोळ्यातील पाऊस....

तू कधी अजिंक्य हृदयातील विजयाचा उन्माद...
आणि कधीतरी काळीज हेलावून टाकणारी आर्त आर्त साद....

तू अंतरंग उलगडून सांगणार्‍या अपार मिठीचा आभास....
जीव उधळून द्यावा अशा उत्तुंग प्रेमाचा अभिध्यास....

तू सर्वस्व हरवून बसलेल्या मीरेच्या मनाचा गाभारा....
कोण्या अनामिक मनःपूर्तीसाठी दूरवर निखळलेला तारा.....

तू विठुरयाच्या सावळया वात्सल्याची परिसीमा....
आणि येशूच्या गाहिर्‍या नजरेतील अथांग गरिमा.....

तू ज्ञान...तू भक्ती....
तू सामर्थ्य....अन् मुक्ती.....

तू माझ्यामधेच सामावलेल्या सृजनाचा ओघ.....
आणि तरीही.....कधीच न संपणारा तुझा अतर्क्य वेडा शोध..!

-- वेदवती जोशी

Comments

Rohan Athalye said…
Sundar bhaashaa...aani sundar arth..

V all r searching...true when u say..its a Veda Shodh...coz v r searching for our ownselves....in a path that resembles a circle...thr is no start to it and no end to it...
Mayur said…
kevdhi narcissistic kavita aahe...

"तू माझ्यामधेच सामावलेल्या सृजनाचा ओघ.....

आणि तरीही.....कधीच न संपणारा तुझा अतर्क्य वेडा शोध........वेदवती जोशी" ???
Amol said…
Thanks Vedavati, After Long days i read beautiful poem.
Do u have more poems of you?
Unknown said…
Sundar.............
sunny said…
Khup sundar...

Popular posts from this blog

Placements...

Goof-Ups!!

A Rendezvous much needed...